'माळेगाव'ची वाटचाल आदर्श होण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार : अजित पवार

संचालक मंडळ पूर्ण निवडून आलेले नसले तरी बहुसंख्य उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली आहे. लोकांना जे मनापासून आवाहन केले होते त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला.
ajit pawar reaction on malegaon result 
ajit pawar reaction on malegaon result 

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी जो विश्वास दाखविला त्या विश्वासाला पात्र राहून राज्यातील एक आदर्श कारखाना बनविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे संचालक मंडळ करेल, चांगला भाव देण्याचे दिलेले आश्वासनही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादीच्या नीळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 16 जागी विजय संपादन करीत सत्तापरिवर्तन केले. अजित पवार यांनी शेवटच्या चार दिवसांत या कारखान्यात सत्तापरिवर्तन व्हावे या साठी जोर लावला होता. राष्ट्रवादीला मिळालेल्या यशानंतर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 

अजित पवार म्हणाले, संचालक मंडळ पूर्ण निवडून आलेले नसले तरी बहुसंख्य उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली आहे. लोकांना जे मनापासून आवाहन केले होते त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. सर्व सभासदांनी जो विश्वास टाकला आहे त्याला पात्र राहून पुढील पाच वर्षात चांगला कारभार केला जाईल. चांगला भाव देण्याची जी माळेगावची परंपरा आहे ती जपून तसाच चांगल्या पध्दतीचा भाव देण्याचा प्रयत्न नवीन संचालक मंडळ करेल. महाराष्ट्राच्या स्तरावर माझ्याकडून जी मदत लागेल ती माझ्याकडून केली जाईल. राष्ट्रीय पातळीवर जी मदत लागेल ती पवारसाहेब व सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून घेतली जाईल, आदर्श कारखाना म्हणून माळेगावची वाटचाल होईल या साठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com